logo

श्रीराम नवमी उत्सवा निमित्त धरणगावात विविध कार्यक्रम संपन्न..

धरणगाव येथील श्री बालाजी मंदिरात श्रीराम नवमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. किरण महाराज यांचा सुश्राव्य सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रभू श्री रामचंद्रांच्या अनेक लीलांचे वर्णन केले त्यानंतर श्री जीवन आप्पा बयस आणि राजपूत समाज भजनी मंडळ यांचे सहकारी यांचा सुंदर असा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दुपारी ठीक 12 वाजता प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांनी भगवान श्री रामा चा जयघोष करीत प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली व नंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला
श्री बालाजी मंदिराचे पुजारी श्री गणेश पुराणिक आणि श्री कालिदास पुराणिक यांनी यथासांग पूजाअर्चा केली. कार्यक्रमासाठी श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष श्री डी आर पाटील, चंद्रकांत अमृतकर, किरण वाणी, गणेश राजपूत, शाम भाटिया ,धृवसिंग बयस,मुकेश बयस, मगनसिंग बयस आदि उपस्थित होते.

1
760 views